औरंगाबाद- आमच्या सरकारने दिलेलं आश्वासन सत्यात उतरवून
दाखवलं. आरक्षण मिळालं म्हणजे अभ्यास करण सोडू नका. तांत्रिक आणि उच्च शिक्षणात
असलेलं मागासलेपण दूर करा असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी
केले.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शनिवारी रोजी
भाजपा च्या कार्यकर्त्यांनी हर्सूल, सावंगी, चौका, गणोरी, फुलंब्री, पाल, पिरबावडा, लाडसावंगी, दुधड,
करमाड,
शेंद्रा,
चिकलठाण,
मुकुंदवाडी
मध्ये जाहीर आभार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. बोलताना
बागडे म्हणाले की, गॅस फक्त श्रीमंतांची मक्तेदारी होती. या
सरकारने प्रत्येक घरातील माता भगिनींना गॅस चे वाटप केले. आता कुडाच्या घरात पण
गॅस वर स्वयंपाक केला जात आहे. रस्ते, पाणी आणि वीज सारख्या सर्व सुविधा या सरकारने
प्रत्येक व्यक्तीला दिल्या.
आरक्षणावर बोलताना ते म्हणाले,
मागच्या सरकारला
आरक्षण द्यायचेच नव्हते पण निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी आरक्षण दिले होते. परंतु
कायदेशीर बाबी ची पूर्तता केली नसल्याने ते आरक्षण कोर्टात टिकू शकलं नाही. परंतु
आम्ही दिलेलं आरक्षण हे कायदेशीर बाबी पूर्ण करून देण्यात आलं आहे या आरक्षणाला
मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असल्याने त्यामुळे कोणी कोर्टात जरी गेलं तरी ते टिकणार
आहे.
असे विधान
विधानसभा अध्यक्ष नी केले. आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चा च्या आनोदलकांनी
माझ्या
घरासमोर
घंटानांद केला होता तेव्हा मी त्यांना सामोरे जाऊन आश्वस्त केलं होतं की,
आरक्षण आमचंच
सरकार देणार आणि विधेयकावर माझीच सही असणार आहे, आणि त्याची
पूर्तता मी केली आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.












